1 . |
योजनेबद्दल माहिती |
योजनेचा लक्षांक (उद्दिष्ट):-
महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभागा कडील दिनांक 28 जुलै 2023 रोजीच्या शासननिर्णयान्वये राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणा-या इतर मागास प्रवर्गातील पात्र कुटूंबाना नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्कया घरात रुपांतर करण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना राविण्यास मान्यता देणेत आली आहे. सदर योजनेमध्ये आवास प्लस मधील प्रतिक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी, आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु automatic system व्दारे reject झालेले पात्र लाभार्थी तसेच जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थी यांचा समावेश केला जातो. सदर योजनेंतर्गत प्राप्त उद्दिष्टाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रमानुसार ग्रामसभेमार्फत उपलब्ध झालेल्या कुटुंबाच्या यादीमधून निवड करण्यात येईल. ग्रामसभेमार्फत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची छानणी तालुका स्तराव गट विकास अधिकारी यांचे मार्फत करण्यात येईल तदनंतर मान्यतेसाठी जिल्हास्तरावर पाठविण्यात येईल. लाभाचे स्वरुप:- निवड झालेल्या लाभार्थी यांनि किमान 269 चौ.फुट क्षेत्रफळाचे स्वयंपाक घर व शौचालयासह घरकुलाचे बांधकाम करणे अपेक्षित आहे. घरकुल बांधकामाकरिता साधारण क्षेत्रात रु.1.20 लक्ष व नक्षलग्रस्त/डोंगराळ लाभार्थ्यांना रु.1.30 लक्ष प्रति लाभार्थी अर्थसहाय्य अनुज्ञेय आहे. सदरचे अनुदान हे आवास सॉफ्ट Awas Soft व Public Fund I Management System (PFMS ) प्रणालीव्दारे Direct Benefit Transfer (DBT) योजनेंतर्गत लाभार्थींच्या बँक/पोस्ट खात्यामध्ये टप्पानिहाय वितरीत करण्यात येतो. तसेच घरकुल अनुदान व्यतिरिक्त स्वच्छ भारत अभियान (SBM) अंतर्गत पात्र लाभार्थ्यास रु. 12000/- शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहनपर अनुदान व मनरेगा (MGNREGA)अंतर्गत 90/95 इतक्या अकुशल मनुष्य दिवसांची मजूरी देण्यात येते. (साधारणपणे ) 26730/- सदर योजनेसविमाभज, इमाव वविमाप्र कल्याण संचालनालयाकडून निधी उपलब्ध करुन दिला जातो.
पात्रता व अटी:- लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील असावा. लाभार्थ्याचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव किमान 15 वर्षे असावे. लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न रु. 1.20 लाखापेक्षा जास्त नसावे. लाभार्थ्याकडे स्वत:ची अथवा शासनानेदिलेली जमीन असणे आवश्यक आहे. अथवा त्याचे स्वत:चे कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधता येईल. तसेच लाभार्थी कुटूंबाने महाराष्ट्र राज्यात अन्यत्र कोठेही शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण/गृहकर्ज योजनांचा लाभ घेतलेला नसावा. आणि लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण अंतर्गतच्या कायमस्वरुपी प्रतिक्षा यादीमध्ये (PWL) समाविष्ट नसावा. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे 7/12 उतारा/मालमत्ता नोंदपत्र/ग्रामपंचायतमधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा अथवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र, सक्षम प्राधिका-याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत व आधार कार्ड, रेशनकार्ड,निवडणूक ओळखपत्र,विद्युत बिल, मनरेगा जॉब कार्ड व स्वत:च्या नावे वापरात असलेल्या बचत खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत असणे आवश्यक आहे.
अर्जाचा नमुना व अर्ज करण्याची पध्दत :- वर्ष निहाय, ग्रामपंचायत निहाय प्राप्त उद्दिष्टानुसार ग्रामसभेने पात्र केलेल्या लाभार्थ्यांचे Offline पध्दतीने ग्रामपंचायती मार्फत अर्ज स्विकारले जातात. अर्ज नमुना सोबत जोडला आहे. |