पंचायत समिती तासगांव ही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. पंचायत समिती तासगांवचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना डिजिटल इंडियाचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
पंचायत समिती मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील
दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत मिळण्यास मदत होईल. डिजिटल इंडिया अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पंचायत राज व्यवस्थेचा विकास होण्यासाठी आम्ही ‘डिजिटल पंचायत’ ही संकल्पना राबवत आहोत.
शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करताना तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींची माहिती, विविध योजना यांची माहिती याद्वारे मिळेल. या संकेतस्थळामधील योजनाविषयक माहितीचा
समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत लाभ घेतला जाईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. संकेतस्थळावर जनतेच्या सुचना, अभिप्राय देखील अपेक्षित आहेत.
ज्याद्वारे पंचायत समितीच्या योजना आखणी व अंमलबजावणी मध्ये ते सहाय्य्यभुत ठरतील व जनसहभाग युक्त विकासप्रक्रिया साध्य करता येईल.
अधिक वाचा >>